विकासाची दृष्टी असलेल्यांना बळ द्यावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |

व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा

 
 
 
 
गेल्या २० वर्षापासून जळगाव महानगराचा विकास ठप्प झाला आहे, पण स्वत:चा विकास करणार्‍यांना नाकारण्याची वेळ आली आहे. विकासाची दृष्टी असलेल्या विचाराचे उमेदवार निवडून देण्याची वेळ आली आहे, असे बजावत मतदारांकडून विचारपूर्वक मतदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे, विजय रामचंद्र काबरा यांनी.
 
अकोला अर्बन बँकेचे १५ वर्ष संचालक, जिल्हा व्यापारी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष, पांजरापोळ गो सेवा संस्थानचे अध्यक्ष आणि जनहित प्रश्‍नी, विशेषत: खान्देश मिलच्या वादग्रस्त जागेसंबंधीच्या वादात अनेक पातळीवर चिवट संघर्ष करणारे जळगावच्या व्यापार-उद्योग क्षेत्रातील अभ्यासू, परखड आणि अग्रणी उद्योजक अशी विजय काबरा यांची प्रतिमा आहे. जळगाव मनपाच्या निवडणुकीच्या घमासान लढतीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी तरुण भार ने साधलेल्या संवादात त्यांनी हा रोखठोक विचार मांडला.
 
 
ते म्हणाले की,चांगले रस्ते, पुरेसा वीज व पाणी, पुरवठा, कचरामुक्त आणि सुंदर, स्वच्छ, हिरवेगार शहर अशी प्रतिमा निर्माण करणे हा अगदीच प्राथमिक कर्तव्याचा भाग आहे. पण गेल्या २०-२२ वर्षात तो पूर्ण न बजावताच दर्शनी, दिखाऊ भांडवली विकास म्हणजे मोठमोठी दुकानसंकुले, घरकुले बांधण्यात आली. रस्ते धड नाहीत, स्वच्छताही पुरेशी नाही, मुख्य मार्गावर लगेच आढळेल असे साधे स्वच्छतागृहही नाही. शहरातील मध्यवर्ती परिसरात जिल्हा न्यायालयासमोर गटार तुंबून हजारो नागरिकांना त्रास होतो, रस्ता निकामी होतो, अशी दयनीय, संताजनक अवस्था आहे. मग उद्याने विकसित करणे दूरच, अवघी २ उद्याने विकसित झालीत, ती फक्त जैन उद्योगसमूहाने केली.
 
 
मनपा शाळांचीही वाट लागली, गरजू मुलांना धड शिक्षण घेता येत नाही, हे भीषण, संतापजनक वास्तव आहे. छोटे-मोठे उद्योगही अडचणीत आले आहेत. गेल्या २०-२२ वर्षात विकास झाला, तो विशिष्ट गटाचा झाला. समान न्यायही मिळत नाही... उदाहरण द्यायचे झाले तर खान्देशमिल जागेचा अधिन्यास मंजूर झाला, मात्र रस्ते, गटारी, खुली जागा मनपाच्या ताब्यात न देता त्यांचा विकास खाजगी रितीने झाला, महामार्गाच्या समांतर रस्त्यासाठी भूसंपादन करतांना जागामालकांकडून मात्र सारे कर वसूल करण्यात आले, मनपाकडून हा न्याय इतरांना का नाही?... हा पक्षपात का?...असा सवालही त्यांनी केला. विकासकामे गतीने व उत्तम व्हावीत, यासाठी तरी ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, त्यांना सत्तेची संधी मिळावी, अशी अपेक्षाही विजय काबरा यांनी व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@