आसनगाव स्टेशन रोडची दुरवस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |



 

आसनगाव : शहापूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळख असलेल्या आसनगाव स्थानकाजवळील पूर्व व पश्चिम भागातील सर्व्हिस रोडची पूर्ण दुरवस्था झाल्याने शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत.
 

मध्य रेल्वेवरील पहिले ग्रीन स्टेशन ठरलेल्या आसनगाव रेल्वेस्थानक परिसरातील सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली असून, पूर्वेकडील पूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने प्रवाशी आणि वाहनचालकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. सध्या आसनगाव शहराचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून लगतच असलेल्या औद्योगिक वसाहत, मोठमोठ्या विकासकांचे हाऊसिंग प्रोजेक्ट व मोठमोठी महाविद्यालये यामुळे रोज हजारो प्रवासी आसनगाव स्थानकातून प्रवास करीत असतात, पण सध्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना व वाहनचालकांना याचा नाहक प्रचंड त्रास होत आहे. मागच्या वेळी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी आसनगाव स्थानकाचा दौरा केला होता. त्यावेळी रेल्वे अधिकार्‍यांनी काही कामे घाईत उरकली होती. सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे मातीचा भराव करून केलेला रोड पूर्ण चिखलमय झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वेने हा रस्ता लवकरात लवकर बनवावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@