ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांचे सासवडकडे प्रस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |


पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पहाटे पुण्याहून सासवडकडे रवाना झाल्या आहेत. पुण्यातील हडपसर मार्गे या दोन्ही पालख्या आज सासवड घाटातून सासवड मुक्कामी जाणार आहे. पुणे शहरातून हजारो भाविक या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून गेले आहे. दरम्यान पालखी सोहळ्यामुळे हडपसरमार्गे होणारी सर्व वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे.


आज पहाटे माउलींच्या आणि तुकोबांच्या पालख्यांची पहाटपूजा झाल्यानंतर विठू नामाच्या गजरामध्ये दोन्ही पालख्या हडपसरकडे रवाना झाल्या आहेत. राज्यभरातून आलेल्या वारकरी भक्तांसह पालखीला चार पावलांची सोबत देण्यासाठी म्हणून पुणे शहरातून देखील हजारो भाविक या दिंडीसोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. आज वारीतील ज्ञानेश्वरांच्या पालखीचा पहिला मुक्काम हा हडपसरजवळ होणार आहे. त्यानंतर सासवड घाटाच्या पायथ्याला थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर घाट चढणीला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच तुकोबोरायांची पालखी ही हडपसरहून लोणीकडे रवाना होणार आहे.



दरम्यान माउलींच्या पालखी सोहळ्याला गेल्या ८ वर्षांपासून सोबत करणाऱ्या 'हिरा' या मानाच्या अश्वाचा काल पुणे येथे मृत्यू झाल्यानंतर 'राजा' नावाचा नवा अश्व आता पालखी सोहळ्याला सोबत करत आहे.
@@AUTHORINFO_V1@@