देशातील सर्वाधिक खाद्य व्यावसायिकांची नोंदणी महाराष्ट्रात : मदन येरावार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
नागपूर : देशात सर्वाधिक अशी ९ लाख ४३ हजार खाद्य व्यावसायिकांची नोंदणी राज्यात करण्यात आली आहे. अभियान स्वरुपात नोंदणीची प्रक्रिया सुरु असून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून छोट्या खाद्य विक्रेत्यांना नोंदणी प्रक्रियेत आणण्याचे काम सुरु असल्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
 
 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना येरावार म्हणाले, खाद्य व्यावसायिकांना परवाना-नोंदणी देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत ७ लाख ६६५ खाद्य व्यावसायिकांनी नोंदणी केली असून २ लाख ११ हजार ५२७ खाद्य व्यावसायिकांना परवाने देण्यात आले आहे. देशात ३६ राज्यांमध्ये ३८ लाख खाद्य व्यावसायिकांची नोंदणी झाली असून त्यामध्ये सर्वाधिक ९ लाख ४३ हजार व्यावसायिकांची नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे.
 
 
किरकोळ खाद्य व्यावसायिक नोंदणी आणि परवान्याच्या कक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. १२ लाख रुपयांपर्यंत ज्यांची वार्षिक उलाढाल आहे अशा खाद्य व्यावसायिकांची नोंदणी केली जाते आणि १२ लाखांच्या वर उलाढाल असणाऱ्यांना परवाने देण्यात येतात, असेही येरावार यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य योगेश सागर, अमित साटम, मेधा कुलकर्णी, सरदार तारासिंग यांनी भाग घेतला.
@@AUTHORINFO_V1@@