मुंबईची पुन्हा तुंबई; रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |



मुंबई : उपनगर परिसरात आज पहाटेपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे चाकरमाने व विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. मागील १५ तासांमध्ये मुंबईतील विविध केंद्रांवर सुमारे १५० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. दरम्यान, स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार पुढील २४ तासात मुंबई उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

मुंबई उपनगरातील पावसाचे अपडेट

 

- मुंबई उपनगरातील संततधार पावसामुळे मध्य रेल्वेवर परिमाण झाला असून लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम आणि हार्बर मार्गावरची लोकलसेवाही १० मिनिटे उशिराने सुरु आहे.

 
 
 

- तुर्भे स्टेशनवर पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला असून यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाण्याहून वाशीला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

 

- मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील लोकल खोळंबल्या खोळंबली आहे.

 

 
 

- वसईतील मीठागरांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे ४०० जण अडकले आहेत. बचाव पथक त्यांच्या मदतीला पोहचले असून पावसाच्या वाढत्या जोरामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.

 

- मुंबईतील रस्त्यांवर सर्च ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. ईस्टन एक्स्प्रेस हायवेवर पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 
 
 

- मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षेला जे विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे.

 

- अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी आजची म्हणजेच ९ जुलै ही अंतिम तारीख होती, मात्र उपनगरातील संततधार पावसामुळे पहिल्या फेरीची मुदत वाढवून १० जुलै करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@