मुंबईला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |



मुंबई : मुंबईमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पुन्हा एकदा मुंबई शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुंबईसह दादर, डोंबिवली, कुर्ला, कल्याण, ठाणे या भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला सुरु असून सर्व ठिकाणी गुडघाभर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान उल्हासनगरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणाहून वाहणारी वालधुनी नदी ही दुथडी भरून वाहून लागली आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीतील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदी किनारी असलेल्या वस्त्यांनासतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

याचबरोबर ठाणे आणि डोंबिवलीमधील सर्व रस्ते हे जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे रस्त्यावरून होणाऱ्या वाह्ह्तुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकी १० ते १५ मिनिटांनी उशिरा सुरु आहे.




याचबरोबर येत्या ४८ तासांमध्ये मुंबईसह पालघर, रायगड, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्र देखील येत्या तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आपली हजेरी लावेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@