बदलापूरची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |



 

बदलापूर: बदलापूरमध्ये वाहनांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत असलेला एकमेव उड्डाणपूल अपुरा पडत असल्याने बेलवली विभागात नवीन उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली असल्याची माहिती आ. किसन कथोरे यांनी दिली.
 

फॉरेस्ट नाका ते बेलवली आणि पूर्वेकडील क्रीडा संकुल ते कात्रप, होप इंडिया या महामार्गाचे काँक्रिटीकरण आणि पथदिव्यांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राम पातकर, गटनेते राजेंद्र घोरपडे, भाजप शहर अध्यक्ष संभाजी शिंदे, महिला अध्यक्षा मेधा गुरव, माजी उपनगराध्यक्ष शरद तेली, सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक किरण भोईर, संजय भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना कथोरे म्हणाले की, बदलापूर येथे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल अपुरा पडत असल्याने या पुलावर दिवसेंदिवस वाहतूककोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. उड्डाणपुलावरील वाहतूककोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पश्चिमेकडील बेलवली आणि पूर्वेकडील ग्रामीण रुग्णालय या भागात नवीन उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली. मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील बहुतेक सर्व रस्ते काँक्रिटीकरणाचे करण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारा सर्व निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेला आहे.

 

मुख्यमंत्र्यांची वचनपुर्ती

पालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरला येऊन बदलापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, हे वचन दिले होते. हे वचन त्यांनी पूर्ण केले असल्याचे सांगून बदलापूरकरांच्या वतीने आ. किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले.

@@AUTHORINFO_V1@@