युतीसाठी आजचा दिवस निर्णायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

मुख्यमंत्र्यांशी बोलून युतीचे ठरणार, ना. गिरीश महाजन यांची माहिती

जळगाव :
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा आणि खाविआची युती करण्याचा आदेश वरूनच आहे पण सध्या जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. मात्र, आम्ही युतीबाबत अजूनही सकारात्मक आहोत. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती रविवारी ना. गिरीश महाजन यांनी दिली.
 
 
आ. चंदूलाल पटेल यांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ना. महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, चंद्रकांतदादा यांच्याशी जळगाव महापालिकेच्या संभाव्य निवडणुकीबाबत चर्चा झाली. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाकडून अनेकजण इच्छुक आहेत. बाहेरूनही अनेकजण पक्षात आहेत.
 
 
जागा वाटपाबाबत चर्चा झाली असून, त्यानुसार शिवसेनेला स्थानिक पातळीवर प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादीने आमच्याकडे लक्ष न देता आधी स्वतःचे उमेदवार निवडून येतील हे पाहावे. अन्यथा जामनेरमध्ये हा पक्ष जसा शून्यावर राहिला तशीच गत त्यांची जळगावमध्येही होईल, असे ना. महाजन यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. युती न झाल्यास ५५ ते ६५ जागा भाजपाला मिळतील आणि युती झाल्यास भाजपा ५० पेक्षा कमी राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@