शेतकर्‍यांच्या हितासाठी शासन प्रयत्नशील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

जामनेरला लाभार्थी मेळाव्यात ना.गिरीश महाजनांची स्पष्टोक्ती

 
जामनेर : केंद्र आणी राज्यातील भारतीय जनता पक्षाची सरकारे प्रत्येक नागरिकांचे जीवनमान कसे उंचावेल, त्यांचा विकास कसा होईल, यासाठी अनेक योजना राबवित आहेत, शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनांच्या हिताचे निर्णय घेत आहे, असेे प्रतिपादन जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
 
 
बाबाजी राघो मंगल कार्यालयात आयोजित ‘लाभार्थी’मेळाव्यात ते बोलत होते. लवकरच सर्व लाभार्थ्यांच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेत वाढ करण्यात येईल,योजनेपासुन कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहाणार नाही, दलालांना थारा देऊ नये, पेन्शनयोजनेसाठी कोणालाही पैसा न देता भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असाही सावधानतेचा इशारा ना.महाजन यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर सभापती रुपाली पाटील, समितीचे अध्यक्ष नवल पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, उपसभापती सुरेश बोरसे, ऍड. शिवाजी सोनार, गोविंद अग्रवाल, जगन्नाथ चव्हाण, चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, गोपाळ नाईक, बाबुराव हिवराळे, बेबाबाई भुसारी, भागवत पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रशांत भोंडे,बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, वासुदेव घोंगडे,नीता पाटील,अतिष झाल्टे, रवींद्र झाल्टे, नाजीम शेख, अंनिस शेख, खलील खान, संगीता पिठोडे, कैलास नरवाडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
४९१ लाभार्थीना एकाच वेळी लाभ
लाभार्थी मेळाव्यात संजय गांधी निराधार योजनेचे ४२७लाभार्थी, श्रावण बाळ योजनेचे ४३८,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ४४१,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेचे१८२,तर इंदिरा गांधी अपंग योजनेची ३ अशी एकूण १४९१ लाभार्थीना एकाच वेळी लाभ मिळाला
 
 
दीडपट हमीभावाचे स्वागत
ना. महाजन यांनी केंद्रसरकारने नुकताच जाहीर केलेल्या दीडपट हमीभावाचे स्वागत केले. आता खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन देशाच्या सर्वांगीण विकासाचेही चित्र पालटेल. त्याचबरोबर शेतीला बारमाही पाणी, पुरेशा प्रमाणात वीजेसह आदी माफक दरात बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@