विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
नागपूर : पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत शपथ दिली.
या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सर्वश्री कपिल हरिश्चंद्र पाटील, (मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे, (कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे, (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ), विलास विनायक पोतनीस, (मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ) यांचा समावेश आहे.
यावेळी सभागृह नेते तथा महसूलमंत्री चंद्रकात पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सदस्य उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@