ताजमहालमध्ये नमाजपठणास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : ताजमहालमध्ये नमाजपठणासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच ताजमहाल हे जगातील सातवं आश्चर्य म्हणून ओळखले जाते, त्यामुळे तेथे कोणालाही नमाजपठण करता येऊ शकणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
 
शुक्रवारी नमाज पठणासाठी ताजमहाल हा इतर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत असे त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची गैरसोय होत असे म्हणून या मुद्द्याला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात आला होता. तसेच नमाजपठणासाठी इतरही जागा आहेत तेथे जाऊन नमाजपठण करावे, असेही सर्वोच्च नायायलयाने सांगितले आहे.
 
ताजमहाल मधील नमाजाच्या मुद्दयावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय इतिहास संकलन समितीच्या वतीने ऑक्टोबर २०१७ मध्ये ताजमहालमध्ये होणाऱ्या नमाजपठण बंद करण्याची मागणी केली होती. तसेच ताजमहाल हे एक राष्ट्रीय वारसास्थळ आहे, त्यामुळे मुसलमानांना त्याला धार्मिक स्थळ म्हणून वापरण्याची परवानगी दिली आहे का? त्यांना तिथे नमाज पठणाची परवानगी असल्यास हिंदूंनाही शिव चालीसा पठणाची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@