राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून गेलेल्यांपैकी एकही निवडून येणार नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

जिल्हाध्यक्ष आ.डॉ.सतीश पाटील यांचा संताप

 
 
जळगाव :
महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर आल्यावर इतर पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना फोडून आमिषे देत आहे. त्याला काही प्रमुख कार्यकर्ते बळी पडत आहे. मात्र, त्याचा पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही. निवडणुका आल्या की पक्ष प्रवेश सुरुच असतात, हे मान्य आहे. परंतु असे पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते निवडून येणार नाही, त्याची रा.कॉं.दखल घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आ.डॉ.सतीश पाटील यांनी पत्रकारांना दिली. आकाशवाणी चौकाजवळील पक्षाच्या कार्यालयात रविवारी, ८ रोजी आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते.
 
 
यावेळी पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खा.ऍड.वसंतराव मोरे, ऍड.रवींद्र पाटील, गफ्फार मलिक, अरुण पाटील, विकास पवार, कल्पना पाटील, मंगला पाटील, कल्पिता पाटील यांच्यासह रा.कॉं.पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुका आल्यावर पक्ष प्रवेश होत असल्याने रा.कॉं.पक्षाला कुठलेही खिंडार पडलेले नाही. रा.कॉं.तही अनेकांनी पक्षात येण्याची मागणी केली आहे. रा.कॉं.शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन मनपाची निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी रा.कॉं.चे नेते, पदाधिकारी शहरातील प्रत्येक प्रभाग पिंजून काढणार आहे. माजी मंत्री अजीत पवार यांच्यासह धनंजय मुंडे, नवाब मलिक, फौजिया खान आदी नेते अधिवेशन संपल्यावर २० जुलैला तळ ठोकणार आहे.
 
 
रा.कॉं.ने शहराच्या विकासाचा जाहीरनामा तयार केला असून तो येत्या दोन दिवसात निश्चित केला जाईल. कॉंग्रेसशी आघाडी करण्याची भूमिका रा.कॉं.ने घेतली आहे. जागा वाटपाचे सूत जुळल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येतील. आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जनतेनेही एकवेळा सत्तेच्या चाव्या दिल्यास शहराचा खुंटलेला विकास करण्याचा निर्धार सर्वांनी एकदिलाने केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या २५ कोटींचा निधी पहायला मिळाला नाही. शहराचा अद्यापही विकास झालेला नाही. त्यामुळे निवडणूक काळात जनताच आता त्यांना जाब विचारणार असल्याचे आ.डॉ.सतीश पाटील यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@