निर्भया प्रकरण : आरोपींना फाशी मिळणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
अपराध्यांची पुनरावलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
 
 
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची पुनरावलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली यावेळी न्यायालयाने हा निर्णय मान्य केला. २०१२ मध्ये झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. मागील वर्षी या प्रकरणात चारही दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. चार दोषीमधील तीन जणांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 
 
 
 
नवी दिल्लीतील मेडिकल कॉलेजची विद्यार्थांनी असलेल्या निर्भया उर्फ ज्योती सिंग या विद्यार्थिनीवर १६ डिसेंबर २०१२ रोजी चालत्या बसमध्ये या चारही आरोपींनी अत्याचार केला होता. यानंतर निर्भयाचा सिंगापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून आरोपांवर कारवाईची मागणी केली जात होती. दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती. आता यातील तीन आरोपींना शिक्षा होणार हे शिक्कामोर्तब झाले आहे. 
 
 
 
या शिक्षेनंतर आरोपींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयकडे माफीसाठी अर्ज करत, आरोपींची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून त्यांना सुधारण्याची एक संधी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होता. न्यायालयाने यावर सुनावणी करण्यासाठी तीन न्यायाधीशांची नियुक्ती केली होती. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टप्रमाणे गेले ४४ दिवस यावर सुनावणी केली जात होती. मात्र आता त्यांची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@