निफ्टी लवकरच जाऊ शकतो ११ हजार बिंदूंवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

निफ्टी १० हजार ६०० बिंदू ते १० हजार ८०० बिंदूंदरम्यानच
भारतीय रुपयाच्या अवमूल्यनाचा लाभ आयटी, फार्माला

 
व्यापारयुद्ध भडकणार तर सोने पुन्हा चकाकणार!
खरीप लागवडीतील विलंबाने कांद्याच्या भावा मध्ये होऊ लागली वाढ!
गेल्या काही आठवड्यां प्रमाणे मागील आठवड्याअखेर ही राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १० हजार ७०० बिंदूंच्या पातळीवर बंद झाला आहे. गेल्या आठवडाभरात तो १० हजार ८०० बिंदूंच्या स्तरापर्यंतही जाऊन परतला होता. तब्बल सहा आठवड्यां पर्यंत निफ्टी १० हजार ६०० ते १० हजार ८०० बिंदूंच्या मर्यादेत(रेंज बाउंड)च राहिलेला आहे. भारतीय रुपयाच्या अवमूल्यनामुळे गुंतवणुकदार साशंक बनले आहेत. त्यामुळे ते निर्देशांका च्या प्रत्येक उसळीनंतर तत्परतेने नफा वसुली (प्रॉफिट बुकिंग) करु लागले आहेत.
 
असे असले तरी कमकुवत रुपयामुळे माहिती तंत्रज्ञान(आयटी) व औषध निर्मिती(फार्मास्युटिकल्स) या क्षेत्रातील कंपन्या ‘फॉर्मा’त आलेल्या आहेत! याबरोबरच टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड (टीसीएस) या कंपनीच्या बायबॅक ऑफरमुळे तिचे शेअर्स उच्च पातळीवर वधारले आहेत. या आठवड्यापासून कंपन्यांचे निकाल जाहीर होणार असल्याने निर्देशांक सकारात्मक स्थितीत राहण्याची शक्यता आहे.
 
 
जुलै सिरीजसाठी निफ्टीचा कॉल बेस ११ हजार बिंदूंचा राहणार असला तरी गेल्या आठवड्यात निफ्टी एका विशिष्ट रेंजमध्येच राहिलेला असून १० हजार ६०० बिंदू ते १० हजार ८२० बिंदूंदरम्यान त्याचे दृढीकरण(कन्सॉलिडेशन) झालेले आहे. त्याला १० हजार ८३५ बिंदू , १० हजार ८८८ व १० हजार ९२८ बिंदूंदरम्यान प्रतिकार (रेझिस्टन्स) आहे. हा प्रतिकार मोडून काढल्यास तो ११ हजार बिंदूंपर्यंत जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 
बँक निफ्टी गेल्या २४ व्यापार सत्रापासून २६ हजार बिंदू ते २६ हजार ८०० बिंदूंदरम्यान राहिलेला आहे. त्याला २६ हजार २०० बिंदूंवर महत्वाचा आधार मिळणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. हा निर्देशांक याच महिन्यात २६ हजार ५०० बिंदूंपर्यंत उसळला होता. २६ हजार ४०० बिंदूंच्या पुटच्या आसपास पोझिशन्स तयार झालेल्या असतांना तेथेच निफ्टीला जवळचा आधार निर्माण झालेला आहे. तर कॉल बेस २६ हजार ७०० ते २७ हजार बिंदूंपाशी केंद्रीत असल्याने हा निर्देशांक एखाद्या वेळी तिथपर्यंत झेप घेऊही शकतो. म्हणजेच बँक निफ्टी सातत्याने २६ हजार ७५० बिंदू बिंदूंच्या वर बंद झाला तर तो आणखी वर जाऊ शकतो. जर तो २६ हजार ४०० बिंदूंच्या खाली गेला तर तो २६ हजार २५० बिंदू ते २६ हजार १०० बिंदूंच्या पातळीवर येऊ शकतो.
 
 
खाजगी क्षेत्रातील बँकांचा वरचष्मा राहिलेला असतांना यस बँक व इंड्सइंड बँक या मिडकॅप चीही चढती भांजणी राहिलेली आहे. इकडे अमेरिका व चीन दरम्यान व्यापारयुद्धाचे रणशिंग फुंकले गेले असल्याच्या पार्श्‍वभूमिवर विकसनशील देशातील बाजारपेठांत काही प्रमाणामध्ये भीती व अनिश्‍चितते चे वातावरण पसरणार आहे. तशातच अमेरिकन फेडरल बँक येत्या सप्टेंबरात व्याजदरात वर्षातील तिसरी तर डिसेंबरात चौथी वाढ करणार असल्याने शेअर बाजारातील अनिश्‍चिततेत भरच पडणार आहे.
 
 
येत्या आठवड्यात अमेरिका चीनी मालाच्या आयातीवर २०० अब्ज डॉलर्सचे शुल्क लादणार असल्याच्या पार्श्‍वभूमिवर बाजारावर थोडेफार दडपण येऊ शकते. तसेच रुपयाचे आणखी अवमूल्यनही होऊ शकतो. याचा लाभ भारतीय आयटी कपन्यांना आणि निर्यातदारांना मिळू शकतो.
 
 
हे व्यापारयुद्ध असेच भडकत गेले तर चीन अमेरिकेतील कोषागारामधील बिलांची विक्री करुन सोन्याची खरेदी करु शकतो. अमेरिकेच्या बँकर्सनाही काळजी वाटू लागली आहे की, मंदीची लाट पुन्हा येऊ शकते व जागतिक बाजारपेठेतील तणावाचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसू शकतो.
 
 
आतापर्यंत सोन्याची प्रमाणाबाहेर विक्री झालेली (ओव्हरसोल्ड) आहे. त्यामुळे आता हा पिवळा धातू पुन्हा चकाकण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. सोन्याच्या किंमतींनी प्रति औस ११२४ डॉलर्स ३० सेंट्सचा नीचांक डिसेंबर २०१६ मध्ये गाठलेला आहे.
 
 
त्यानंतर जुलै २०१७ मध्ये १२०४ डॉलर्सचा थोडा वरचा नीचांक गाठला होता. पुन्हा डिसेंबर २०१७ मध्ये आणखी थोडा वरचा म्हणजे १२३८ डॉलर्स व ३० सेंट्सचा नीचांक गाठला होता. सोन्याने नुकताच थोडा पुढचा म्हणजे १२३८ डॉलर्स व ८० सेंट्सच्या ताज्या नीचांकापाशी येताच चांगली उसळी घेतली आहे.
 
 
सोन्याने आपल्या तक्त्या (चार्ट)वर ‘हेड ऍण्ड शोल्डर’चा पॅटर्न धारण केला आहे. सोने सध्या १४०० डॉलर्सच्या रेंजमध्ये असून लवकरच नेकलाईनच्यावर जाणार आहे. ते मध्यम कालावधीत १७०० डॉलर्सवर जाऊ शकतो. नियमित व्यवहार करणारे ट्रेडर्स व गुंतवणुक दारही १३५० डॉलर्सच्या नीचांकाच्या आसपास सोने खरेदी करु शकतात. एकदा का सोन्याची किंमत १४०० डॉलर्सच्या वर जाऊ लागली की ते दीर्घ कालावधीत १७०० ते १७५० डॉलर्सपर्यंत (३१ हजार ६०० रुपये ते ३२ हजार ५०० रुपये) मजल गाठू शकते.
कांद्याच्या भावात पुन्हा तेजी, करणार ग्राहकांचा वांधा!
कांद्याच्या भावात पुन्हा तेजी येऊ लागली आहेे. या आठवड्यात तो १० ते १२ टक्क्याने वाढलेला आहे. दिल्लीतील कांद्याचा भाव १७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढलेला अहे.तर महाराष्ट्राच्या लासलगाव बाजारपेठेत तो १४१५ रुपये प्रति क्विंटल या भावाने विकू लागलेल आहे. याचे कारण म्हणजे मे आणि जूनच्या उन्हाळ्यातील उष्णतेने राजस्थान व मध्य प्रदेशातील कांदा खराब झालेला आहे. खरीप कांदा लागवडीलाही विलंब झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याच्या आवकवर परिणाम होणार आहे. मुंबईत किरकोळीत कांदा सध्या २० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. त्याचे भाव आणखी वाढल्यास तो ग्राहकांचा व ऐन निवडणुकांच्या तोंडावर सरकारचाही वांधा करणार आहे!
 
@@AUTHORINFO_V1@@