माध्यमांनी विधिमंडळ कामकाजाचे तटस्थपणे वृत्तांकन करावे - गजानन निमदेव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
नागपूर :  विधिमंडळ हे जनमताचा आरसा आहे. संसदीय लोकशाहीत विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं. विधानपरिषद व विधानसभेत जनहिताच्या चर्चा होत असतात. माध्यमांनी विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन तटस्थपणे करावे असे प्रतिपादन नागपूर तरूण भारतचे संपादक गजानन निमदेव यांनी केले.
 
 
विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर निमदेव बोलत होते. यावेळी राज्यातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी, अधिव्याख्याते उपस्थित होते.
 
 
निमदेव म्हणाले, न्यायपालिका, कायदेमंडळ आणि लोकप्रशासन यांच्याबरोबरीने माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करीत असतात. माध्यमांची भूमिका ही निष्पक्ष आणि तटस्थ हवी. विधिमंडळातील चर्चा,घटना यांचे योग्य अवलोकन करून वार्तांकन करणे गरजेचे आहे. न घडलेल्या घटनांची माहिती प्रसिद्ध करता येत नाही. सभापती अथवा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्याशिवाय प्रश्नोत्तरे होत नाहीत. ती प्रसिद्ध करता येत नाहीत, अन्यथा विधिमंडळाचा हक्कभंग होतो, काहीवेळेस संपादकाला शिक्षाही होऊ शकते. काहीवेळा सदस्याने आक्षेपार्ह विधान केले अन ते कामकाजातून काढून टाकले असेल तर ते प्रसिद्ध करता येत नाही, याचे भान माध्यमांना हवे.
 
 
अधिवेशन हे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील समस्या मांडून त्यावर चर्चा घडवून आणून सोडविण्यासाठी असते.येथे गुणवत्तापूर्ण व अभ्यासू चर्चा होणे अपेक्षित आहे. गोंधळ घालून कामकाज करणे हा सदस्याचा अधिकार आहे, मात्र यावरही अंकुश ठेवायला हवा. माध्यमांनी गदारोळाला महत्त्व देऊ नये, तरच सभागृहातील कामकाजाची स्थिती सुधारेल. अनेक सदस्य गंभीरपणे वेगळ्या पद्धतीने भागातील समस्या मांडत असतात,यावरही माध्यमांचे लक्ष हवे. एखाद्या सदस्याला न्याय मिळत नसेल तर माध्यमांनी त्यांची भूमिका मांडायला हवी. अभ्यासपूर्ण सदस्यांच्या भूमिकांना माध्यमांनी योग्य स्थान द्यायला हवे, असेही श्री. निमदेव यांनी सांगितले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@