'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील डॉ. हाथीचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

 
 
 मुंबई :  प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील डॉ. हंसराज हाथी या भूमिकेत असलेले कवि कुमार आजाद यांचे आज निधन झाले. दृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना मुंबईच्या मीरारोड येथील 'व्होकहार्ट रुग्णालय' येथे दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यामुळे चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण आहे.
 
या प्रसिद्ध मालिकेतील गोकुलधाम सोसायटी ही सामान्य माणसाच्या आणि मुख्यकरुन लहान मुलांच्या जीवनाचा एक भाग झाली होती. यामधील कलाकार त्यांच्या रोजच्या जीवनातील एक सदस्य असेच होते. त्यामुळे लहानग्या चाहत्यांना आता डॉ. हाथी पुन्हा दिसणार नाहीत, यामुळे त्यांच्यात शोककळा पसरली आहे.
 
 
 
 
 
कवि कुमार आजाद हे एक कवि होते. त्यांना अभिनयाची आवड असल्या कारणाने ते या क्षेत्रात आले. 'मेला' या चित्रपटामध्ये ते आमिर खान सोबत देखील दिसले, मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून. तारक मेहता या मालिकेला लवकरच १० वर्षे पूर्ण होणार आहेत, यासंबंधी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंबंधी आज सेटवर बैठक देखील आयोजित करण्यात आली होती, मात्र या बैठकीपूर्वीच अचानक ही बातमी आल्याने मालिकेच्या कलाकारांना धक्का बसला आहे.
@@AUTHORINFO_V1@@