जिल्ह्यात अभाविपचा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

जिल्ह्यात अभाविपचा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा

 
जळगाव, ९ जुलै :
 
अभाविपला ७० वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
 
 
शहरातील मु.जे. महाविद्यालय येथे समाज विखंडनाचे षड्यंत्र या विषयावर अभाविप पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री देवदत्त जोशी यांचे व्याख्यान झाले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी उद्योजक संजय बिर्ला यांचे इंजिनिअरिंग फॉर नेशन या विषयावर व्याख्यान झाले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रसिद्ध उद्योजक jव सामाजिक कार्यकर्ते भरतदादा अमळकर यांनी राष्ट्रपुर्ननिर्माणात अभियंत्यांचे योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
 
जामनेर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान व आयएमआर महाविद्यालयात अभाविप परिचय विषयावर व्याख्यान झाले. बोदवड येथील एस.एन.राका महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर महाविद्यालयात अभाविप परिचय मांडणी व पत्रक वाटप कार्यक्रम झाला. यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माधवराव गोळवलकर रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर झाले. याठिकाणी ५१ विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. तसेच स्थापना दिनाच्या पूर्व संध्येला रविवारी जे.डी.बेंडाळे महाविद्यालय, जळगाव याठिकाणी अभाविप पूर्व कार्यकर्ता एकत्रीकरण होऊन जिल्ह्यातील ४ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
@@AUTHORINFO_V1@@