जळगावची ‘ती’ दोन मुले पालकांच्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

समता नगरातून झाली होती बेपत्ता : समतोल 

जळगाव, ८ जुलै :
 
शहरातील समतानगर येथील बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले ५ रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर ‘समतोल’ प्रकल्पाच्या सहकार्‍यांना आढळून आली. ती त्यांनी ८ रोजी जळगाव पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
 
 
समतानगर येथून गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन मुले हरविली होती. याबाबत त्यांच्या पालकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ती दोन मुले ५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर ‘समतोल’च्या सहकार्‍यांना दिसली. त्यांनी त्यांची विचारपूस करुन पोलिसांकडे नोंद केली. त्या मुलांची चौकशी करता आपण घरातून निघून आल्याचे त्यांनी सांगितले. ते जळगावचे असल्याचे लक्षात येताच मुंबई येथील ‘समतोल’ प्रकल्पाच्या पदाधिकार्‍यांनी जळगाव येथे पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली, तर पोलिसांनी जळगाव येथील ‘समतोल’ प्रकल्पातील सहकारी प्रदीप पाटीलला कळविले. त्याने पोलीस ठाण्यात जावून शहानिशा केली. रविवार ८ जुलै रोजी जळगावचे पोलीस मुलांच्या पालकांसह मुंबईला पोहचले. समतोलच्या सहकार्‍यांच्या उपस्थितीत त्या मुलांना पालकांच्या हवाली करण्यात आले. यावेळी समतोलचे प्रमुख विजय जाधव, रवींद्र बोराडे, मुबारक मग्दुल, स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र प्रमुख रमेश पवार उपस्थित होते.
 
 
बहुतांश बालके हे घरात माता- पित्यांशी संवादाचा अभाव असणे, घरातील परिस्थिती या कारणांनी घरातून बाहेर पडलेली असतात. पालक आणि बालक यांच्यात संवादाचे अंतर कमी झाले पाहिजे
- विजय जाधव,
समतोल फाउंडेशन मुंबई
@@AUTHORINFO_V1@@