मुंबईकरांना पावसाने झोडपले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |



मुंबई: आठवडयाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये दाखल झालेल्या पावसाने सोमवारीदेखील हजेरी लावली. दरम्यान, स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासात मुुंबई, ठाणे, रायगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुंबईकरांचे प्रवासादरम्यान दमछाक झाली. मुंबई, ठाण्यामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम मध्य, पश्‍चिम, हार्बर रेल्वेमार्गावरील सेवेवर झाला. बहुतांश रेल्वे स्थानकांच्या रूळावर पाणी साचल्याने लोकलचा वेग मंदावला. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी विलंब झाला. तसेच काही प्रवाशांनी परिस्थितीचा आढावा घेत परतीचा मार्ग स्वीकारला. पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला. पावसाने लोकलसेवेबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या, तर मध्य रेल्वेच्या खास करून कळवा,ठाणे मुलुंड, शीव, माटुंगा रेल्वे स्थानकाच्या रूळांवर पाणी साचले होते.

 

तसेच स्थानकांच्या आजूबाजूच्या परिसरामध्येदेखील पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातून वाट काढण्याची कसरत करावी लागली. याचबरोबर कुर्ला ते लोकमान्य टिळक टर्मिनस हा रस्ता जलमय झाला. या रस्त्यावर दोन फुटांपर्यंत पाणी भरले. अंधेरी सब वे, अंधेरी जंक्शन याबरोबरच मालाडमधील भुयारी मार्गांखाली सांडपाणी साचले. या पावसाचा फटका रेल्वेसह रस्ते वाहतुकीलाही बसला. पश्चिम उपनगरातील वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी या भागांतही दमदार पाऊस झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळित झाली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने २२५ ठिकाणी पाणी भरण्याची ठिकाणे निश्तिच केली असून त्यापैकी १२० ठिकाणी वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली होती. त्यामुळे त्याठिकाणी पाणी साचले नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांनी समुद्रातमध्ये जाऊ न दुर्घटना होऊ नये, यासाठी सहा समुद्र किनार्‍यावर 36 जीवरक्षक, अग्‍निमशन दलाची पूर बचाव पथक, शहर आपत्ती प्रतिसाद पथक , सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच एकूण १२ ठिकाणी शॉर्टसकिर्र्ट झाल्याची माहिती पालिकेने दिली.

@@AUTHORINFO_V1@@