भूकंपाचा केंद्रबिंदू जयनगर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
जळगाव :
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महापौर ललित कोल्हे व इतर नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर झालेल्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू हा जयनगरमधील आ. चंदूलाल पटेल यांचे निवासस्थान असल्याच समोर आले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील रविवारी भाजपाच्या संपर्क अभियानात जळगावमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना आ. पटेल यांच्या निवासस्थानी अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या. पण पालकमंत्र्यांचा आजचा दौरा म्हणजे विरोधकांसाठी कात्रजचा घाट होता. चंद्रकांतदादा सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास आ. पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी बंद दाराआड ना. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा आटोपताच ना. गिरीश महाजन यांना ‘राजकीय भूकंपा’साठी शुभेच्छा देत ते पुढील दौर्‍यासाठी रवाना झाले. इकडे ना. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष (महानगर) आ. सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) उदय वाघ, माजी नगरसेवक कैलास सोनवणे व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कंचन चेतन संकत यांनी पतीसह भाजपात प्रवेश केला. पण प्रवेशाचे हे धक्कातंत्र इथेच थांबले नाही.
 
 
महापौर ललित कोल्हे हे देखील दुपारपासूनच आ. पटेल यांच्या निवासस्थानी वेटिंगवर होते. तेथे ना. महाजन यांच्याशी झालेल्या गोपनीय चर्चेनंतर त्यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा प्रवेशसोहळा सायंकाळी भाजपा कार्यालयात पार पडला.
@@AUTHORINFO_V1@@