पंतप्रधान नरेंद्र मोदी, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि मेट्रो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : आज दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाई इन भआरताच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी दिल्ली येथे मेट्रो सफर केली. या भेटीदरम्यान ते नॉएडा येथील सॅमसंग प्रकल्पाला भेट देणार आहेत. दक्षिण कोरिया दिल्ली मेट्रो निर्मितीत महत्त्वाची भुमिका पार पाडत असल्याने पंतप्रधान आणि मून यांची ही मेट्रो सफर महत्वाची ठरणार आहे.
 
 
 
 
 
पंतप्रधान आणि मून यांच्या या मेट्रोसफरीमुळे दिल्ली येथील सामान्य नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. यावेळी सामान्य नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या या मेट्रो सफरीमुळे सामान्य नागरिकांना देखील त्यांची भेट घेता आली.
 
मून व त्यांची पत्नी किम जंग सूक काल भारतात दाखल झाले आहेत. काल दिल्ली येथे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.
 
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकॉम टर्नबुल यांच्यासह मेट्रो सफर केली होती. त्याआधी २०१६ मध्ये मोदींनी फ्रान्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांसह देखील मेट्रोमध्ये सफर केली होती.
@@AUTHORINFO_V1@@