चाळीसगाव पालिका सभेत आरोग्याच्या समस्येवर सत्ताधार्‍यांसह विरोधक एकत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

आरोग्य विभागाची अनास्था, शिवसृष्टी, अमरधाम रस्ता व मेळनदी परिसर विकास मुद्दा गाजला

चाळीसगाव :
पालिकेची सर्वसाधारण सभा हिरापूर रोडवरील नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी अकरा वाजता झाली, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. पालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर सभापीठावर होते, तर सभागृहात कै.अनिलदादा देशमुख, शहर विकास आघाडीचे गटनेते माजी आमदार राजीवदादा देशमुख, सत्ताधारी भाजपचे गटनेते जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, आघाडी उपगटनेते सुरेश स्वार , आण्णा कोळी, घृष्णेश्वर पाटील ,नितीन पाटील आनंद खरात ,मानसिंग राजपूत, शेखर बजाज, संजय पाटील, चिरोगोद्दीन शेख, अरुण आहिरे , चंद्रकांत तायडे, विजया प्रकाश पवार ,विजया भिकन पवार, वत्सलाबाई महाले,वैशाली सोमसिंग राजपूत ,वैशाली महेंद्र मोरे, झेलाबाई पाटील, रामचंद्र जाधव, सुरेश चौधरी ,रवींद्र चौधरी, शेखर देशमुख, दीपक पाटील, सविता राजपूत, प्रतिभा देशमुख, वंदना चौधरी, रंजनाबाई सोनवणे, गीताताई पाटील, संगीता गवळी, अलका गवळी, योगिनी ब्राम्हणकार, सायली जाधव यांची उपस्थिती होती तर उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण ,शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक नानाभाऊ कुमावत आघाडीचे नगरसेवक सूर्यकांत ठाकूर यांची अनुपस्थिती होती.
 
 
सुरुवातीला दिवंगत भाजपचे जेष्ठ नेते कै. वाडीलाल राठोड , पंचायत समितीचे सदस्या कै. रूपाली साळुंखे यांच्यासह दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली, सभा लिपिक दीपक देशमुख यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले
 
 
यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तो उल्लेख योग्य असल्याचे रेटून सांगत असतांना राजीव देशमुख याची मुख्याधिकारी यांचेशी तू तू मै मै झाली... तुम्ही कोणत्या कायद्याखाली तुम्ही ही नोंद घेत आहात, याचा खुलासा करण्याची मागणी केली, अखेर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी हस्तक्षेप करीत तो उल्लेख इतिवृत्तांतून काढण्याचे सभा लिपिकांना बजावले.
 
अभ्यासू वकिलांची नियुक्ती करण्याची ग्वाही
पालिकेची बॉडी बदलली म्हणजे वकील, डॉकटर बदलला पाहिजे या मागचे प्रयोजन काय ? असा मुद्दा राजीव देशमुख यांनी उचलून धरला वकिलांची नेमणूक करतांना त्यांच्या अनुभवाचा व नावलौकिकाचा विचार व्हावा, असा आग्रह त्यांनी अध्यक्षांकडे धरला. आपल्या सूचनेनुसार अभ्यासू वकिलाची नियुक्ती केली जाईल, असा विश्वास नगराध्यक्षा यांनी सदस्यांना दिला.
 
 
अमरधाम रस्ता पुन्हा तयार करून घेऊ - नगराध्यक्षा आशालता चव्हाण
या रस्त्याच्या तक्रारीची दखल मी स्वतः घेतली आहे.ठेकेदाराकडून काम करून घेतांना मी व पालिका अधिकारी जातीने लक्ष ठेऊन होतो.मात्र गटारीच्या पाण्याच्या निचर्‍या अभावी हा रस्ता तीन चार ठिकाणी उखडला आहे, ठेकेदारकडून तो पुन्हा तयार करून घेतला जाईल तसेच सभागृहात आलेल्या सूचना ,तक्रारी व मागण्या यांचेवर लागलीच कार्यवाही केली जाईल, ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.
 
 
पाकिट मिळाल्याचा आरोप आम्ही का सहन करायचा...
अमर धाम रस्त्याच्या प्रश्नावर रंजनाबाई सोनवणे यांनी रस्त्याचा दुर्दशेबाबत लक्ष वेधून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून आम्हाला काही पाकीट मिळाले असल्याचा आरोप जनता करते, असे बेधडक विधान केल्याने शांतता पसरली, यावर अभियंता राजेंद्र पाटील यांनी ठेकेदार नवीन असून त्याचे बावीस लाख रु. पालिकेने रोखून धरले आहे त्यातून पावसाळ्यानंतर हा रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल, अशी माहिती दिली.
 
 
* पथदिवे व जेसीबी पुरवा
नगरसेविका सविता राजपूत, संगीता गवळी, वंदना चौधरी , अलका गवळी, यांनी पथदिवे व जेसीबी पालिका पुरवत नाही, अशी तक्रार केली यावर शिवसेनेच्या विजया पवार यांनी सुरात सूर मिळवत आरोग्य अधिकारी संजय गोयर यांनी अपेक्षित उत्तर देण्याची मागणी केली.
 
 
* वस्तू शिल्लक नाही, हे उत्तर किती काळ?
नगरसेवक दीपक पाटील पालिकेकडे जनतेच्या तक्रारीनुसार फवारणी असो वा पथदिवे यांची मागणी केली की त्यावर वस्तू शिल्लक नाही, असे ठरलेले उत्तर मिळते यांचे दुःख वाटते, अशी कैफियत मांडली.
 
 
राजीव देशमुख व मुख्याधिकार्‍यांमध्ये तू-तू, मैं-मैं
मागील सभेच्या प्रोसिडिंगचे वाचन सुरु असताना त्यातील आक्षेपार्ह शब्द वगळण्याचे राजीवदादा देशमुख यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली व सभेच्या मंजुरीची गरज नसल्याचे लक्षात आणून दिले नवीन कामाच्या निविदा काढण्यात दिरंगाई करण्यात आली. पुढील टेंडर होईपर्यत कामाला सुरूवात करता येईल मात्र हा मोघम विषय असतांना त्याला सभागृहाची मंजुरी घेण्याची गरज नाही. मागील टेंडर नवीन दराने होणार असल्याने तोपर्यंत काम करण्यास मुभा अनेकदा दिली जाते मात्र त्याला सभेची अनुमती घेण्याचे काहीच कारण नाही त्यामुळे संमती देणं अर्थात जबाबदारी निश्चित करणे सारखे आहे त्यामुळे इतिवृत्तामध्ये हा उल्लेख टाळावा, तो काढून टाकण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली यावर जोरदार चर्चा घडली.
 
@@AUTHORINFO_V1@@