जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक दहशतवादी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. कालपासून हंदवाडा भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. शेवटी आज सुरक्षा रक्षकांना एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश मिळाले आहे. 
 
 
 
सध्या हंदवाडा भागात सुरक्षारक्षकांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला असून या भागात शोध मोहीम राबविली जात आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या या चकमकीत बरेच जवान आणि सुरक्षा रक्षक शहीद झाले. या चकमकीत बरेच दहशतवादी देखील मारल्या गेले आहेत. त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये सध्या सुरक्षा रक्षकांकडून चोख सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@