चंद्रपूर मनपा क्षेत्रासाठी ९ कोटी ६० लक्ष रू. निधीला मंजूरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील नागरी दलित वस्त्यांच्या सुधारणे साठी 28 कोटी 42 लक्ष 48 हजार रू. निधी मंजूर
 
 
राज्‍याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नागरी दलित वस्‍ती सुधारणा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील चंद्रपूर महानगरपालिका तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी 28 कोटी 42 लक्ष 48 हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आलेला आहे.
 
 
 
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्‍त्‍यांसाठी 9 कोटी 60 लाख इतका निधी सदर योजनेअंतर्गत मंजूर झाला असुन बल्‍लारपूर नगर परिषद क्षेत्रासाठी रू. 6,29,64,442 इतका निधी मंजूर करण्‍यात आला आहे. भद्रावती नगरपालिका क्षेत्रासाठी 2,83,44,402 रू., वरोरा नगर परिषद क्षेत्रासाठी 1,25,41,599 रू., ब्रम्‍हपूरी नगर परिषद क्षेत्रासाठी 1,85,29,285 रू., राजुरा नगर परिषद क्षेत्रासाठी 1,04,29,559 रू., गडचांदूर नगर पंचायत क्षेत्रासाठी 1,07,87,614 रू., मुल नगर परिषद क्षेत्रासाठी 1,01,75,534 रू, चिमूर नगर परिषद क्षेत्रासाठी 76,42,537 रू., नागभीड नगर परिषद क्षेत्रासाठी 83,00,584 रू., सिंदेवाही नगर पंचायत क्षेत्रासाठी 60,19,194 रू., सावली नगर पंचायत क्षेत्रासाठी 47,51,486 रू., गोंडपिपरी नगर पंचायत क्षेत्रासाठी 29,07,987 रू., पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रासाठी 24,91,869 रू., जिवती न.प. क्षेत्रासाठी 8,03,440 रू. तर कोरपना न.प. क्षेत्रासाठी 15,31,411 रू. निधी नागरी दलित वस्‍ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर करण्‍यात आला आहे. 
 
 
 
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर सदर निधी जिल्‍हयातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत क्षेत्रातील अनुसुचित जाती लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात निश्‍चीत करण्‍यात आलेला आहे. या निधीच्‍या माध्‍यमातून चंद्रपूर जिल्‍हयातील नागरी क्षेत्रातील दलित वस्‍त्‍यांच्‍या विकासाचा, सुधारणांचा मार्ग सुकर झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने विविध योजनांतर्गत निधी मंजूर करत , जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रकल्प मंजूर करत जिल्ह्यात विकासाचा अभूतपूर्व झंझावात आणणाऱ्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर सदर निधीतुन जिल्ह्यातील दलित वस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@