थायलंडमधील गुहेत अडकलेल्या १२ पैकी चार मुलांची सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |



बँकॉक : थायलंडमधील थाम लुआंग या गुहेमध्ये गेल्या गेल्या आठवड्याभरापासून अडकून पडलेल्या १२ मुलांपैकी चार मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. थायलंड नौदलासह ऑस्ट्रेलिया, ब्रिटेनसह एकूण सात देशांमधून  बचाव दलांना बोलावण्यात आले आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमधूनच आतापर्यंत चार मुलांना वाचवण्यात आले असून उर्वरित मुलांचे शोध घेणे अद्याप सुरु आहे. दरम्यान या शोध मोहिमेमध्ये बचाव दलातील एका जवानाचा देखील मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुलांना मदत करतना त्याचा मृत्यू झाला आहे.


गेल्या दोन आठवड्यांपूर्वी हे सर्व मुले फुटबॉलचा सामना खेळल्यानंतर सायकलवरून फिरायला म्हणून या गुहेमध्ये आली होती. यावेळी अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे ही १२ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेमध्ये अडकून पडले. तब्बल ९ दिवसांहून अधिक काळ हे सर्व जण या गुहेमध्ये अडकून पडले आहेत. थायलंडमध्ये सुरु असलेया मुसळधार पावसामुळे गुहेत अचानक पाणी शिरल्यामुळे गुहेचे प्रवेशद्वार बंद झाले. तसेच मुलांना पोहता येत नसल्यामुळे हे सर्व जण गुहेत अडकून पडले. दरम्यान मुले घरी न आल्यामुळे पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर तब्बल तीन ते चार दिवसांच्या शोधानंतर ही घटना समोर आली. यानंतर मुलांच्या सुटकेसाठी म्हणून प्रयत्न करण्यात आले. यासाठी परदेशातून 'रेस्क्यू टीम'ला बोलावून मुलांना बाहेर काढण्यासाठी मदत सुरु करण्यात आली.





दरम्यान गुहेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे बचाव दलाला मदत करण्यात अडथळा येथ आहे. यासाठी म्हणून गुहेतील पाणी काढण्यासाठी म्हणून देखील प्रयत्न केले जात आहे. गुहेमध्ये पाईप टाकून गुहेतील पाण्याचा उपसा केला जात आहे. यामुळे आतापर्यंत १६ सेमीपर्यंत गुहेतील पाणी पातळी कमी झाली आहे. परंतु गुहेच्या इतर भागांमधून पुन्हा एकदा गुहेत पाणी झिरपत आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता स्थानिक हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचाव कार्याचा वेग वाढवण्याची मागणी केली जात आहे.


दरम्यान गुहेतून बाहेर काढण्यात आलेल्या ४ मुलांना जवळील रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरापासून या मुलांनी कसल्याही प्रकारचे अन्न खाल्लेले नाही. गुहेतील पुराचे पाणी पिऊन त्यांनी दिवस काढल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये काही काळ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@