कंत्राटी कामगारांना संरक्षण दिले पाहिजे : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |
 
 
 
पुणे : कामगारांचे प्रश्न आता जटील होत चालले आहेत. विशेषत: कंत्राटी कामगारांचा वर्ग पुढे आलाय. पण कंत्राटदारी पद्धतीमुळे कामगारांमध्ये स्थैर्य राहिले नाही. मला वाटते की कंत्राटी कामगारांना संरक्षण दिले पाहिजे. महिला कामगारांच्या प्रश्नाकडे देखील स्वतंत्र भूमिकेतून पाहायची आवश्यकता आहे असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाने संघटीत, कंत्राटी व प्रशिक्षणार्थी यांचा ‘भव्य कामगार मेळावा‘ आज सणसवाडी, पुणे येथे आयोजित केला होता. यावेळी मेळ्यावाला उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 
 
 
भाजपा सरकारच्या नोटाबंदीमुळे हजारोजणांच्या नोकऱ्या गेल्या. रोजंदारी कामगारांचे, असंघटित कामगारांचे अतोनात हाल झाले. संघटनेने कामगारांचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यावे. मी तुमच्या खांद्याला खांदा लावून कामगार कल्याणासाठी लढत राहीन असे आश्वासन पवार यांना यावेळी उपस्थित कामगारांना दिले. कामगार चळवळीचे आद्य संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतींना पवार यांनी यावेळी अभिवादन केले.
 
 
 
आज सरासरी जीवनमान सुधारले आहे. सायकलींवरून, टेम्पो - ट्रकने येणारा कामगार मोटारसायकलने मेळाव्याला येतो आहे. पण कामगारांचे प्रश्न जटील होत चालले आहेत. विशेषत: कंत्राटी कामगारांचा वर्ग पुढे आलाय. पण कंत्राटदारी पद्धतीमुळे कामगारांमध्ये स्थैर्य राहिले नाही असे सांगत पवार यांनी कामगारांच्या प्रश्नांसदर्भात चिंता व्यक्त केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@