वर्ल्ड जिम्नॅस्टिक्स चॅलेंजमध्ये दीपाची 'सुवर्ण' कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |

तब्बल दोन वर्षांनंतर खेळात पुनरागमन 





तुर्की : तुर्कीमधील मर्सिन येथे सुरु असलेल्या एफआयजी जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेमध्ये भारताच्या दीपा कर्माकर हिने सुवर्ण कामगिरी केली असून स्पर्धेमध्ये सर्वात उत्तम कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे तब्बल दोन वर्षांच्या अंतरानंतर तिने पुन्हा एकदा स्पर्धेत पुनरागमन केले असून पहिल्याच प्रयत्नात तिने सुवर्णपदक मिळवले आहे. दीपाच्या या कामगिरीसाठी सर्व स्तरातूनचे तिचे कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी देखील दीपाचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

 
स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये दीपाने १३.४०० गुण मिळवत स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यानंतर आजच्या खेळामध्ये १४.१५० गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. दीपापाठोपाठ इंडोनेशियाच्या रिफदा इरफानालुतफी हिने १३.४०० गुण मिळवत रौप्य पदकावर आपले नाव कोरले असून त्यानंतर तुर्कीच्या गोक्सु उक्टास सानिल हिने १३.२०० गुण मिळवत रौप्य पदक मिळवले आहे. याचबरोबर आगामी होणाऱ्या बॅलन्स बीम या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये देखील दीपाची निवड झाली आहे. बॅलन्स बीमच्या पात्रता फेरीमध्ये दीपाने ११.८५० गुण मिळवले आहेत.



रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अवघ्या काही गुणांनी दीपाचे सुवर्णपदक हुकले होते. यानंतर एका स्पर्धेमध्ये पायाला दुखापत झाल्यामुळे तब्बल दोन वर्ष ती या खेळापासून दूर राहिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कठोर परिश्रम करून तिने या खेळामध्ये दमदार पुनरागम केले आहे. विशेष म्हणजे जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये दीपाचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.
@@AUTHORINFO_V1@@