ज्ञानोबा-तुकोबांच्या दर्शनासाठी पुणेकरांची झुंबड !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |

तुका म्हणे जाती | पाप दर्शने विश्रांती



पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांच्या आज पुणे मुक्कामामध्ये लाखो पुणेकरांनी आज या पालख्यांचे दर्शन घेतले आहे. आज सकाळपासून भाविक या पालखी सोहळ्यांच्या दर्शनासाठी म्हणून गर्दी करत असून आतापारुंत लाखो भाविकांनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले आहे.


आषाढीवारीच्या आपल्या दुसऱ्या मुक्कामासाठी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. नाना पेठेमध्ये दोन्ही पालख्यांचा मुक्काम असून संपूर्ण पुणे शहर आज 'विठ्ठल नाम'ने दुमदुमून  गेलेले आहे. दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असल्यामुळे पुणे शहरासह आसपास सर्व भागांमधून भाविक आज या पालख्यांच्या दर्शनसाठी म्हणून पुण्यामध्ये आले आहेत. त्यातच रविवारच्या सुट्टीचा योग साधून अनेक भाविक सहकुटुंब दर्शनासाठी म्हणून शहरात आले आहे. ज्ञानोबा-तुकोबांबरोबरच वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेचा देखील पुणेकर आज आनंद घेत आहेत. संपूर्ण शहरामध्ये आज दोन्ही पालख्यांचे वारकरी आल्यामुळे शहरात सर्वत्र भाविकांच्या राहणायची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी शहरातील व्यापारी आणि सामान्य भाविका वारकऱ्यांची आपल्या परीने सेवा करताना दिसत आहेत. दरम्यान आजचा मुक्काम संपवून उद्या सकाळी दोन्ही पालखी हडपसरमार्गे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत हडपसर भागातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे.


आषाढी वारीच्या १८ दिवसांच्या प्रवासामध्ये ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या या पुणे आणि वाखरी या दोनच ठिकाणी एकत्र येतात. त्यातही पुण्यामध्ये या दोन्ही पालख्या संपूर्ण एक दिवसाचा मुक्काम करतात. त्यामुळे पुणे मुक्कामामध्ये भाविकांना या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेता येते. तसेच सासवड घाटापर्यंत पालखीला सोबत करण्याचे भाग्य देखील भाविकांना लाभते. त्यामुळे दोन्ही पालख्यांचा पुणे मुक्काम ही अनेकांसाठी एक खास पर्वणीच ठरते.
@@AUTHORINFO_V1@@