आसनगावसाठी पाच कोटी रुपयांची पाणी योजना : शिंदे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |



शहापूर : आसनगावमधील पाणी समस्या पाहता पाच कोटी रुपयांची पाणी योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा नुकताच शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 

शहापूर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतीमुळे नागरिकांना प्रशासकीय कामाकरिता असुविधा होत होती. शासनाने सन २०१४ -१५ च्या अर्थसंकल्पात तरतूद करून जनसुविधा योजने अंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालयासाठी असलेला निधी वापरून हे प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले आहे.  यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आसनगाव शहराची पाणी समस्या पाहता पाच कोटी रुपयांची पाणी योजना अंतिम स्तरावर असून लवकरच या योजनेचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले. तसेच ग्रामीण भागात रस्ते, आरोग्य, पाणी, वीज समस्या अग्रक्रमाने सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

 

यावेळी जि. प. अध्यक्षा मंजुषा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, आ. रुपेश म्हात्रे, आरोग्य व बांधकाम सभापती बाळ्यामामा म्हात्रे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महिला जिल्हाप्रमुख रश्मीताई निमसे, माजी आमदार दौलत दरोडा, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर चंदे, संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर तळपाडे, आसनगांव ग्रामपंचायतीचे सरपंच जालिंदर तळपाडे, उपसरपंच नितीन चंदे, शहर प्रमुख बाँबी चंदे, सहकार सेना तालुका अध्यक्ष, किरण सोकांडे, युवासेना तालुका अध्यक्ष विनोद म्हसकर, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष सुधीर गोरले, कामगार सेना तालुका अध्यक्ष भगवान वेखंडे, न्याय विधी तालुकाप्रमुख सेवक उमवने, उपतालुकाप्रमुख शिवाजी चंदे,

@@AUTHORINFO_V1@@