सिंहगडाच्या घाटात दरड कोसळली, गडावर जाण्याचा मार्ग बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |

 
 
 
पुणे :  पुण्यात सिंहगडाच्या घाटाच्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटेच्या सुमाऱ्यास ही घटना घडली. त्यामुळे गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आठवडा शेवट असल्याने आणि पावसाळी वातावरण असल्याने पुण्यातील अनेक पर्यटक कांदा भजी आणि पिठलं भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी तसेच गडावरचे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येथे येतात, मात्र दरड कोसळल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.
 
 
 
 
 
 
यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला असून अनेकांना अर्ध्यारस्त्यातूनच परत जावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सिंहगडाच्या बाजूला आज जावू नये असा सल्ला वन विभागातर्फे देण्यात आला आहे. यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली असून थोड्यावेळात वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 
दरम्यान दरड काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे, मात्र संपूर्ण रस्ता खुला होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे मात्र सांगता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या रविवारी ठरवण्यात आलेला सिंहगडाचा बेत नागरिकांना पुढच्या रविवारसाठी राखून ठेवावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@