भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |

 
 
 
कॅन्सस (अमेरिका) :  अमेरिकेच्या मिसौरी राज्यातील कॅन्सस शहरात एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली. शरथ कोप्पुला (२५ वर्षे )असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
 
 
 
 
या गोळीबारात शरथ गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, मात्र यामुळे त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.
 
शरथ हा वारंगळचा रहिवासी आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने हैदराबादमध्ये नोकरी केली. तो याच वर्षी एमएस करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. शरथचे वडील राम मोहन हे बीएसएनएलमध्ये कर्मचारी आहेत. त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि तेलंगणाच्या एनआरआय मंत्रालयाकडे शरथचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@