घाटकोपर पुलावरील वाहतूक बंद, सतर्कतेचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |
 
 
मुंबई :  अंधेरी येथे पूल दुर्घटना झाल्यानंतर आता घाटकोपर येथे देखील पूल झुकला असल्याचे आढळले आहे. त्यामुळे येथे पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली असून शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. घाटकोपर भागात मध्यरेल्वे वरील असलेल्या या पुलाखालून अनेक गाड्या आणि लोकल जातात, त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, या भितीने आणि काळजी म्हणून हा पूल सध्या बंद करण्यात आला आहे.
 
 
 
 
महापालिकेकडून हा पूल दोन्ही बाजूने बंज करण्यात येणार असल्याची माहिती आज सकाळी पोलिसांना देण्यात आली आहे. पुलाच्या सुरुवातीला असलेले बसस्थानक देखील बंद ठेवण्यात आले आहे. पुलाची दुरुस्ती होईपर्यंत हे बसस्थानक देखील बंद असणार आहे.
 
अंधेरी येथील पुलाचा एक भाग पडून पाच पादचारी जखमी झाले होते, यामधील एका महिलेचा काल उपचारादरम्यान मृत्यु झाला. या घटनेवरुन धडा घेत आता घाटकोपर येथील पूल झुकला असल्याचा आढळल्यानंतर बंद ठेवण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@