अमित शहा आज असणार पुण्यात, माऊलींच्या पालखीचे घेणार दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |

 
 
 
पुणे :  आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुण्यात एक दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. पुण्यात दाखल झाल्यावर आज ते सगळ्यात आधी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. नाना पेठ येथील निवडुंग विठ्ठल मंदीर येथे आज ते संत तुकोबा महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेणार आहेत.
 
सोशल मीडिया स्वयंसेवकांना मार्गदर्शन :
 
भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांसोबत आणि स्वयंसेवकांसोबत आज अमित शहा बालगंधर्व रंगमंदीर येथे संवाद साधणार आहेत. यावेळी ते सोशल मीडिया संदर्भात त्यांना मार्गदर्शन करतील.
 
 
 
 
 
 
आजच्या जगातील चाणक्यनीति :
 
आज अमित शहा हे आजच्या जगातील चाणक्यनीति विषयी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संबोधित करणार आहेत. यावेळी ते चाणक्यनीति आणि आजच्या परिस्थितीत त्याचे महत्व याविषयी बोलणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
बाबासाहेब पुरंदरे यांची भेट :

दरम्यान या एक दिवसीय दौऱ्यात अमित शहा "संपर्क से समर्थन" या उपक्रमांतर्गत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार आहेत. पर्वती येथील बाबासाहेबांच्या निवासस्थानी म्हणजेच 'पुरंदरे वाडा' येथे ते भेट घेणार असून यावेळी ते अनेक महत्वाच्या विषयांवर बाबासाहेबांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@