अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी घेतले पालखी सोहळ्याचे दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |



पुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज आपल्या एकदिवसीय पुणे दौऱ्यादरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल शिरोळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह शाह यांनी आज पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले आहे.

पुणे येथे आयोजित एका व्याखान कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून शाह हे आज पुण्यामध्ये आले आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम आपल्या सहकाऱ्यांसह नानापेठेतील पालखी चौकामध्ये जाऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. याठिकाणी थोडा वेळ घालवल्यानंतर थोड्या अंतरावर असलेल्या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे देखील त्यांनी दर्शन घेतले, यावेळी तुकाराम महाराज पालखी सोहळा व्यवस्थापनकडून शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार देखील करण्यात आला.




@@AUTHORINFO_V1@@