राजापेक्षा राज्य मोठे हेच चाणक्यांचे सूत्र : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2018
Total Views |



पुणे : 'राजा हा देशाचा सर्वात पहिला सेवक असून राज्यापेक्षा राजा कधीही मोठा होऊ शकत नाही, हेच आर्य चाणक्यांचे मुख्य सूत्र आहे,' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज केले. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून आयोजित आर्य चाणक्य यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानामध्ये आज ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


आर्य चाणक्यांनी इ.स.पूर्व चौथ्या शतकामध्ये एका समर्थ राष्ट्राच्या उभारणी केली होते. राष्ट्रहितासाठी आवश्यक अनेक विषयांवर त्यांनी काळी चर्चा केली होती. जी आजही तंतोतंत लागू पडते. आर्य चाणक्यांनी राज्याला देशापेक्षा अधिक मोठे मानले होते. तसेच देशाचे राज्य व्यवस्थेत घराणेशाही न चालवता एका कर्तृत्ववान व्यक्तीकडे देशाची धुरा नेहमी दिली पाहिजे, असा सिद्धांत त्यांनी मांडला होता. देशाचे राज्य व्यवस्थेपासून ते प्रजेच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनापर्यंत अनेक विषय त्यांनी मांडले होते. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे मात्र यावर कधीही जास्त लक्ष दिले गेले. त्यामुळे आज आर्य चाणक्य हे दंतकथेचा विषय बनत निघाले आहे' असे शाह यांनी यावेळी म्हटले. तसेच आर्य चाणक्यांच्या जीवनावर अधिकाधिक संशोधन करून त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.







भारत हा भूसांस्कृतिक देश


आर्य चाणक्यांच्या जीवनातील अनेक पैलू सांगताना त्यांनी भारताच्या भूसांस्कृतिक राष्ट्रवादावरील चाणक्यांचे मत देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. भारत हे संस्कृतीच्या आधारावर बनलेले राष्ट्र असून ज्या भूभागामध्ये आपला धर्म आणि संस्कृती नांदत नाही, अशा कोणत्याही भागावर आक्रमण कधीही करू नये, असे चाणक्यांनी म्हटले होते. कारण भारत हा एकमेव देश आहे, जो संस्कृतीच्या आधारावर एकत्र आलेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.


संघाने मला आकार दिला

याचबरोबर आर्य चाणक्यांमुळे देशाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणी आर्य चाणक्यांविषयी आपण वाचल्यामुळे देशाबद्दल आपल्या मनात अनेक विचार येऊ लागले आणि याविचारांना संघाने आकार दिल्यामुळे आपण आज याठिकाणी उभे आहोत, असे देखील शाह यांनी यावेळी म्हटले.


अमित शाह यांचे संपूर्ण भाषण  : 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@