प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा खंडाचा प्रकाशन सोहळा संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |


 


पुणे :कोशवाड्मय आपल्याला केवळ ज्ञान देण्यासोबतच माहितीचा स्त्रोतही उपलब्ध करून देतात. यासाठीच कोश उपयुक्त ठरतात. चरित्र आपल्याला पूर्वजांचे स्मरण करून देतात आणि आमच्याकडून काही तरी जगत कल्याण घडावे म्हणून अशा ग्रंथांची गरज असते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

 

प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा या खंडाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ते विशेष अतिथी उपस्थित होते. साप्ताहिकविवेकनेआधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोशहा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील ५००० हून अधिक उत्तुंग व्यक्तीमत्त्वांचा परिचय १२ कोशांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कोश मालिकेतील आठवा खंड प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा याच्या प्रकाशनाचा पुण्यामधील स्वा. सावरकर अध्यासन केंद्रामध्ये संपन्न झाला. इंडियन कौन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्चचे अध्यक्ष डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते या खंडाचे प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकरविवेकसमूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, शिल्पकार चरित्रकोशचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर तसेच खंड संपादक विद्याधर ताठे आणि अरुणचंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या देशाला कोशाची मोठी परंपरा आहे. अजूनही कोशनिर्मिती ही मोठ्या प्रमाणात होत असते. शिल्पकार चरित्रकोशाच्या निमित्ताने इतिहासातील कर्तबगार असून जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा कोशात घेतला गेला आहे. आजची तरुण पिढी ही गतिमान आहे. या पिढीपर्यंत हे ज्ञान पोहचण्यासाठी दृक-श्रुतिगम्य माध्यमातून हा प्रकल्प पुढे आणणार असल्याचे डॉ. जामखेडकर यांनी सांगितले.

 

'विवेकया प्रकल्पामुळे जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करेल. राज्य मराठी विकास संस्था या प्रकल्पाचे महत्व ओळखून या प्रकल्पासोबत आहे. चांगल्या प्रकल्पांना सहाय्य करणे हे राज्य मराठी विकास संस्थेचे काम आहे.

डॉ. आनंद काटीकर ,

प्रभारी संचालक, राज्य मराठी विकास संस्था
@@AUTHORINFO_V1@@