महापालिकेच्या विविध प्रभागातील क्षेत्रांत पाणी साचल्याच्या घटना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |

ठोस कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

 

 

कल्याण : महापालिका क्षेत्रात शुक्रवार, दि. ७ जुलै रोजी सकाळपासून संततधार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासात सरासरी १०० मि.लि. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. महापालिका क्षेत्रात ४ वेगवेगळया ठिकाणी ड प्रभाग येथे - ३, ह प्रभाग परिसरात- २, एमआयडीसी परिसरात-१० व आधारवाडी परिसरात- ७ झाडे कोलमडली असून अग्निशमन व उद्यान विभागामार्फत वरील क्षेत्रातील झाडे उचलण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच ड प्रभागक्षेत्र परिसरात एक भिंत पडली आहे. यात कोणत्याही प्रकारची जिवित वा वित्त हानी झालेली नाही. महापालिकेचे आपत्कालिन पथक व अग्निशमन विभागातील ठेकेदारांकडून(गजानन काळण यांनी) खडवली नदीच्या पात्रातून २ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे तसेच वाडेघर येथे पाण्यात अडकलेल्या १ मुलास अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले. डोंबिवली (पूर्व )स्टेशन रोड, नेहरू रोड, पाटकर रोड, केळकर रोड, इंदिरा गांधी चौकाजवळ मातीयुक्त पाणी साचून रस्ते तुडंब भरल्याने दुपारी १.०० वाजेपर्यंत तेथील सफाई करण्यात आली.

 

अ प्रभागक्षेत्रांतर्गत प्रभाग क्र.१३ मोहने गावठाण येथे गटारी तुंबल्याच्या तक्रारी, क प्रभागक्षेत्रांतर्गत शिवाजी चौक , ब प्रभागक्षेत्रांतर्गत बिर्ला कॉलेज, एम.आय.जी. सोसायटी,पंचरत्न सोसायटी, आर.टी.ओ. ऑफिस, सहयाद्री नगर,मिलींदनगर, रामबाग लेन-४ परिसरात गांधीधाम व गणेश मंदिर व कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. लगेचच सदर तक्रारींचे निराकरण संबंधित प्रभाग कार्यालयांमार्फत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी व आपत्कालिन पथकातील कायर्रत कमर्चा-यांनी पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले असून, त्यानुसार प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी तक्रारींच्या अनुषंगाने कामगारांमार्फत साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची कारवाई केली आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारीचे त्वरेने निवारण करण्याचे आदेश प्रभाग अधिका-यांना देण्यात आले आहेत. पाणी साचलेल्या सखल भागातील पूरग्रस्त नागरिकांसाठी महापालिकेच्या शाळेत संक्रमण शिबिराची व्यवस्था करण्यात आली असून पूरग्रस्तांकरिता तेथे अन्नाची पाकिटे वाटपाची सोय करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@