महाराष्ट्र एक्सप्रेस आणि सुरत पॅसेंजर रद्दजळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशाची गर्दी
@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@
07-Jul-2018
Total Views |
महाराष्ट्र एक्सप्रेस आणि सुरत पॅसेंजर रद्द
जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशाची गर्दी
जळगाव, 7 जुलै
रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ, भादली आणि जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने शनिवारी 5 तासांचा मेगाब्लॉग घेतला.या मेगाब्लॉग मुळे 7 रोजी कोल्हापूर येथुन सुटणारी गाडी क्र. 11039 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तसेच 7 रोजी सुरत येथुन सुटणारी गाडी क्र. 59013 सुरत - भुसावळ पॅसेंजर ही गाडी जळगाव रेल्वे स्थानका पर्यंतच धावणार होती. त्यामुळे या दोन्ही गाडयांनी जळगाव स्थानकावरुन प्रवास करणाया प्रवाशांची गैरसोय झाली. सकाळच्या वेळी भुसावळकडे जाणाया चाकरमान्यांची प्रचंडगर्दी जळगाव रेल्वे स्थानकावर झाली ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी तसेच कोणताही गोंधळ होवू नये म्हणून रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीसांचा बंदोबस्त रेल्वे स्थानकावर लावण्यात आला होता. तसेच चाळीसगाव येथुन महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव व भुसावळला येणाया प्रवाशांची मोठी गर्दी असते परंतु गाडी नसल्याने प्रवाशाची गैरसोय झाली. गोंधळ होवू नये यासाठी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीसांचा बंदोबस्त होता.
@@AUTHORINFO_V1@@