शहाद्यात 1 लाख 26 हजाराचे बनावट खते तीघा विरुद्ध गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
शहाद्यात 1 लाख 26 हजाराचे बनावट खते 
तीघा विरुद्ध गुन्हा दाखल 
 
नंदुरबार, 7 जुलै
 
जिल्हयातील शहादा येथे सुभाष अॅटो मोबाईल प्रकाशा रोड येथे 1 लाख 26 हजार 400 रुपयांचे बनावट खत मिळून आले असून 3 जणा विरुध्द 6 रोजी रात्री शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
सुभाष अॅटो मोबाईल प्रकाशा रोड येथे भुषण सुभाष छाजेड वय 27 , किशोर ब्रिाजलाल पाटील दोन्ही रा. एन.आर.आय.व्हीला मलोणी शहादा आणि जिग्नेश ठक्कर प्रोप्रायटर किसान ऑरगॅनिक , रॉयल टाऊन शीप पी.के.रोड, सारोली ,सुरत , गुजरात यांनी शेतक­यांसाठी आवश्यक असलेले किसान पोटॅश, किसान एन पी के व किसान डी टी पी या कंपनीचे 1 लाख 26 हजार 400 रुपये किमतीचे बनावट खत विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करुन मिळून आले. अरुण श्रीराम तायडे यांच्या फिर्यादीवरुन या तीघां विरुध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. संजय शुक्ला करत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@