पाकिस्तान निवडणुकीत हिंदू महिलेची चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |



लाहोर : पाकिस्तानमध्ये येत्या २५ जुलैला सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. या निवडणुकित सध्या एका हिंदू महिलेची जोरदार चर्चा आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातून पहिल्यांदा हिंदू महिला विधानसभेची निवडणूकीत आपले नशीब आजमावत आहे. सुनिता परमार मेघवार असे या महीलेचे नाव आहे.

 

सुनिता परमार यांनी थारपर जिल्हयातील सिंध विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पाकिस्तानमधील सर्वात जास्त हिंदू या जिल्ह्यात राहत आहेत. याबाबत परमार म्हणाल्या की, या पुर्वीचे सरकारने त्यांच्या मतदारसंघात दिलेली आश्वासने पुर्ण केली नाहीत. तसेच नागरीकांचा जीवनस्तर उंचावण्यात सरकार अपयशी ठरले. या भागात मोठ्या समस्या आहेत, त्या सोडवायच्या आहेत, महिलांना पाण्यासाठी काही कि मी अंतर वणवण भटकावे लागते. यासोबतच महीलांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागृक करण्याची त्यांची इच्छा आहे,असेही त्या म्हणाल्या. यापुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी या भागासाठी काही केले नाही, २१ व्या शतकातही महीलांसाठी प्राथमिक सुविधा आणि शैक्षणिक संस्था नाहीत. महिलांना कमी समजले जाते.

 

महिलांसाठी पाकिस्तान कायम असुरक्षित देश मानला जातो. विशेषत: हिंदू महिलांसाठी येथे राहणे खूप कठीण असते. अनेकदा त्यांचे अपहरण करून जबरदस्तीने धर्म परिवर्तन आणि लग्न केले जाते. यामध्ये सुनिता परमार यांचे हे पाऊल बदलाला गती देईल. सुनिता यांनी आपल्या भागातील महिलांचा शैक्षणिक स्तर आणि त्यांच्या आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी वचननामा जाहीर केला आहे. मार्च मध्ये अन्य हिंदू दलित महिला खासदार झाली होती.

 

विजयी होणारच

मी २१ व्या शतकातील महिला असून वाघाशीही लढण्याची तयारी आहे. या भागतील नागरिक नक्कीच साथ देतील, निवडणूकीत विजयी होणार याचा पुर्ण विश्वास आहे.

सुनिता परमार

हिंदू महिला, उमेदवार

@@AUTHORINFO_V1@@