मुंबईत अतिवृष्टीचा हाय अलर्ट; तर उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |



मुंबई : हवामान विमागाने कोकण, गोवा आणि मुंबईसह मध्य महाराष्ट्रात ७ ते १२ जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवसांत मुंबई व परिसरात रेकॉर्डब्रेक पाऊस होऊ शकतो, असेही हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून एनडीआरएफचे तीन पथकही तैनात करण्यात आले आहेत.

 

मध्य रेल्वे मार्गावर परिणाम

 

रात्रीपासून मुंबई व उपनगरात पावसाने जोर धरला असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याण परिसरात रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुक कोलमडली असून लोकल सेवा उशिराने धावत आहे. तसेच कल्याण, कर्जत, कसारा मार्गावर लोकल ठप्प झाल्या आहेत.

 

खाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

 

सकाळपासून पावसाने जोर धरल्याने मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण उडाली. जोरदार पावसाने मुंबईतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सायन-पनवेल महामार्गावरही खाड्यांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे नागपूरमधील जलमय परिस्थितीवर आरडाओरडा करणारी महापालिका आणि शिवसेना पुन्हा एकदा तोंडावर पडली आहे.

 

तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

 

मुंबईत उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर कुर्ला-वाशीदरम्यान सकाळी ११.१० ते ४.१० या वेळेत, पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव दरम्यान सकाळी १०.३५ ते ३.३५ या वेळेत तर मध्य रेल्वेवरील विद्याविहार आणि भायखळा स्थानकांदरम्यान सकाळी ११.२० ते ४.२० या वेळेत दोन्ही दिशेने ब्लॉक घेण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@