भुसावळात लोणारी समाजाचा रविवारी मेळावा व गुणवंतांचा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |
भुसावळ :
 
शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात लोणारी समाजाचा मेळावा व विविध क्षैत्रातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ रविवार, ८ रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक युवराज लोणारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन आहे. प्रमुख अतिथी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे असतील. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षैत्रातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे.
 
 
यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, राजेंद्र नाटकर, ऍड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे, अनिता सपकाळे, मेघा वाणी, शोभा नेमाडे, राजेंद्र आवटे, निर्मल कोठारी आदी नगरसेवक उपस्थित राहतील. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन राजेंद्र दगडू लोणारी, आयोजक युवराज लोणारी तसेच लोणारी समाज मंडळ व समाजबांधवांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@