गोदेंगावात पिक विम्याचा लाभ मिळत नाही - अशोक औटे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |

 
 
जामनेर, 7 जुलै :
गोदेंगाव वि.का.सोच्या परस्पर कपात केलेल्या पिक विम्याचा सभासदांना लाभ मिळत नसुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप चेअरमन अशोक औटे यांनी केला आहे.
 
 
तालुक्यातील गोदेंगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नियमित सभासदांचे त्यांच्या खात्यातून पिक विम्याची रक्कम परस्पर कपात करण्यात आली आहे. परंतु या विम्याचा लाभ सभासदांना मिळालेला नाही. यासंबधी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालकांची प्रत्यक्ष भेट घेवून तक्रार केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देवून वेळ मारुन नेली.शेतकरी सभासदांच्या प्रश्नांचे निस्सारण करण्यासाठी प्रतिसाद दिला नाही. ज्या सभासदांनी कर्ज घेतलेले नाही अशा सभासदांना आणि ज्यांनी ऑनलाईन पीक विमा भरला अशा सभासदांना या विम्याचा लाभ मिळाला. परंतु कर्जदार शेतक­यांच्या खात्यातुन परस्पर विम्याचे पैसे कापले गेले पण त्यांना या पीक विम्याचा लाभ अजुनही मिळालेला नाही.
 
 
शेतकरी नैसर्गीक संकटाने हैराण आहे. हंगाम हातचा जात असतो. निसर्गाच्या अवकृपेने शेतीचे नुकसान होत आहे. असे असुन सुध्दा गोदेंगावच्या नुकसानग्रस्त शेतक­यांना त्यांच्या हक्काच्या पीकविम्याचे पैसे मिळत नाही. या प्रकरणाची चौकशी करुन शेतक­यांना न्याय द्याव तसेच शेतक­यांना पीक विमा ज्यांच्या चुकिमुळे मिळत नाही अशंावर कारवाई करावी अशी मगणी गोदेंगाव वि.का.सो.चे चेअरमन अशोक औटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@