दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे काः चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |



मुंबई : मुंबईकडे जाणारे दूध रोखायले ते शहर काय पाकिस्तानात आहे का?, असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. राजू शेट्टी यांना विचारला. गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाही तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला एका पत्रकार परिषदेमध्ये दिला. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.

 

दूध बंद करुन वेठीस का धरता, या मागणीसाठी लोकशाही मार्गानेदेखील आंदोलन करता येऊ शकते, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींवर पलटवार केला. दूध बंद करायला मुंबईकडे काय पाकिस्तानात आहे का?, आंदोलन करायचे असेल तर ते लोकशाही मार्गाने करावे, रस्त्यावर भाजीपाला फेकून किंवा दूध टाकून आंदोलन करणे चुकीचे आहे. यात शेतकऱ्यांचेच नुकसान आहे, असे पाटील यांनी सांगितले. मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषण हे मी समजू शकतो, पण मालाची नासाडी करणे हे योग्य नाही, असे ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@