काश्मीरमध्ये आणखी एका पोलीस जवानाची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |



कुलगाम : जम्मू-काश्मीरमध्ये आज पुन्हा एकदा एका पोलीस जवानाची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. कुलगाम येथे ही घटना घडली असून जम्मू-काश्मीर पोलीसमध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेल्या जावेद अहमद दार या जवानाचे अपहरण करून दहशतवाद्यांकडून त्याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान जवानाचा मृतदेह आज सकाळी पोलिसांना कुलगाम येथे मिळाला आहे.

जावेद हा मुळचा शोपियांमधील राहणारा असून गेल्या गुरुवारी दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. जावेद आपल्या आईसाठी औषधे आणण्यासाठी म्हणून मेडिकल स्टोअरमध्ये गेला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर कुलगाम येथे आज सकाळी पोलिसांना त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर कुलगाम स्थानिक पोलिसांनी तत्काळ या घटनेची माहिती कुलगाम पोलिसांना दिली. तसेच जावेदचा मृतदेह सरकारी इतमामात शोपियांकडे रवाना करण्यात आला आहे.



दरम्यान गेल्या महिन्यामध्ये देखील दहशतवाद्यांनी अशाप्रकारे औरंगजेब या लष्करी जवानाची हत्या केली होती. औरंगजेब हा रमजान ईदनिमित्त लष्करातून सुट्टी घेऊन आपल्या घरी येत होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली होती. आतापर्यंत राज्यात अशा एकूण चार घटना घडल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@