संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरीकडे प्रस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |

संपत्ती सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ।।






आळंदी (पुणे) : संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानंतर संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. आज दुपारी ४ वाजता पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार असून आळंदी जवळील गांधीवाडा येथे पालखीचा पहिल्या रात्रीचा मुक्काम होणार आहे.

दरम्यान पालखी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून सध्या माउलींच्या समाधीची महापूजा पहाटेपासून सुरु करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सध्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये दाखल झाले असून माउलींच्या समाधीच्या दर्शनसाठी म्हणून मंदिरामध्ये गर्दी करत आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी स्थानिक प्रशासनाकडून सर्व प्रकारची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण आळंदी ही वारकरी आणि भगव्या पातकांनी फुलून निघाली आहे.

पंढरीकडे प्रस्थान केल्यानंतर आजचा पहिला मुक्काम हा गांधीवाडा येथे होणार आहे. यानंतर उद्या सकाळी पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार असून उद्या संध्याकाळी ज्ञानेश्वर माउली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पुण्यनगरीत आगमन होणार आहे. यादृष्टीने देखील पुणे महानगरपालिकेने सर्व विभागांना विशेष सूचना दिल्याअसून सोहळ्याच्या स्वागतासाठी तयारीला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@