जि.प.मधील अर्थ विभागातील कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |

अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या पीआरओची अरेरावी

 
 
जळगाव, ५ जुलै :
जिल्हा परिषदमधील अखर्चित निधीच्या माहितीसाठी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यासह पीआरओ केदारे यांनी अर्थ विभागात जाऊन विचारणा केली. मात्र माहिती मिळत नसल्याने पीआरओ केदारे यांनी मुख्य वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन यांच्याशी अरेरावी करीत हुज्जत घातली. अर्थ विभागातील कर्मचार्‍यांना वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ अर्थ विभागातील कर्मचार्‍यांनी गुरुवारी लेखणीबंद आंदोलन केले.
 
 
जिल्हा परिषदेचे वार्षिक नियोजन २०१७-१८ व २०१८-१९ मधील विविध कामांच्या निधी खर्चाच्या माहितीसंदर्भातील नोंद वह्या, रोखवह्या व अखर्चित रकमांसंदर्भात अध्यक्षा उज्वला पाटील यांनी अर्थ विभागात जाऊन मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांना विचारणा केली. मात्र, नरेंद्र महाजन यांनी नियोजनासंदर्भातील अपेक्षित माहिती अर्थ विभागात उपलब्ध नसून ती खाते प्रमुखांशी संबंधित असल्याचे सूचित केले. यावेळी अध्यक्षांच्या सूचनेवरुन पीआरओ केदारे यांनीही माहिती मागितली. तसेच विभागातील इतर कर्मचार्‍यांसमोर नरेंद्र महाजन यांना अपमानास्पद वागणूक दिली.
 
 
वारंवार दमदाटी केली जाते
केदारे हे वर्ग ३ चे कर्मचारी आहेत. त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांना सर्वांसमक्ष अपमानित करुन दमबाजी केली. अर्थ विभागाच्या कर्मचार्‍यांवर वारंवार दमदाटी केली जात असल्याचा आरोप जि.प. लेखा कर्मचारी संघटनेने केला आहे. यासंदर्भात सीईओ शिवाजी दिवेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
 
विचारण्यात आलेली माहिती अधिकार्‍यांना अडचणीत आणणारी
मी स्वत: अर्थ विभागाकडून अनेक वेळा माहिती मागूनही मिळत नसल्याने तसेच अर्थ विभागाच्या नियमित तक्रारी येत असल्याने स्वीय सहाय्यक दिनेश देशमुख, जनसंपर्क अधिकारी पुलकेशी केदार यांना सोबत घेऊन अर्थ विभागाला भेट दिली. माझ्या सुचनेनुसार केदार यांनी माहिती का पुरविली जात नाही याबाबत जाब विचारला. ही बाब वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी केदारे यांना ऐकरी भाषेत बोलून अपमानित केले व माहिती देण्यास टाळाटाळ केली. विचारण्यात आलेली माहिती वित्त अधिकार्‍यांना अडचणीत आणणारी आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@