लालबाग उड्डाणपुलावर ट्रक उलटला, वाहतूक पूर्वपदावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |



मुंबई: लालबाग उड्डाण पुलावर आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास बिसलेरीच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ऐन सकाळच्या वेळी हा अपघात झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लिनर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले. लालबाग उड्डाणपुलावरून परळच्या दिशेने जाताना हा ट्रक कलंडला. या अपघाताची बातमी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना दिली. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जखमी चालक आणि क्लिनरला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळवण्यात आली होती. तसेच क्रेनच्या साहाय्याने ट्रक उचलण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@