साने गुरुजी शाळेच्या धान्यात अळ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |

यावल शहरातील प्रकार, धान्य गोदाम केले सील

 
 
यावल : पालिका संचलित साने गुरुजी विद्यालयात मध्यान्ह भोजनासाठी आणलेल्या धान्यात अळ्या व किडे आढळल्याने खळबळ उडाली. शिक्षण समितीच्या सदस्या नगरसेविका रूख्माबाई भालेराव-महाजन, गटनेते राकेश कोलते यांनी बुधवारी शाळेत जावून पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
 
 
याबाबत त्यांनी तक्रार करताच शालेय पोषण आहार अधीक्षक गणेश शिवदे यांनी शाळेला भेट देवून धान्य साठवण केलेल्या गोदामाचा पंचनामा करत मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी संख्येपेक्षा जास्तीचा साठा आढळला आहे.
 
 
शहरात पालिका संचलित साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. येथील विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यासाठी शिक्षण विभागाकडून धान्य पुरवठा केला जातो. दरम्यान, नुकतेच शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन व्यवस्थित दिले जाते किंवा नाही? याची पाहणी करण्यासाठी नगरसेविका रूख्माबाई भालेराव-महाजन व गटनेते राकेश कोलते हे बुधवारी शाळेत गेले. त्यांनी गोदामाची पाहणी केली असता साठवलेल्या धान्यात अळ्या व किडे (धनूर) आढळले. हा जुना साठा असल्याचे मुख्याध्यापक टी.सी.बोरोले यांनी नगरसेवकांना सांगितले. मात्र, नगरसेवकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. यानंतर शालेय पोषण आहार अधीक्षक गणेश शिवदे यांनी शाळेत दाखल होत पंचनामा करून धान्य गोदाम सील केले. मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. चौकशीत अतिरिक्त धान्य आढळल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई करू, असे शिवदे यांनी उपस्थितांना सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@