माऊलींच्या पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |
 
 
 
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. दुपारी चार वाजता विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण राज्यभरातून व देशविदेशातून आलेल्या भाविकभक्तांच्या उपस्थितीत पंढरपुराकडे जाण्यासाठी माऊलींच्या पादुका पालखीत विराजमान झाल्या. 
 
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान, श्रींच्या पादुका शेजघरातुन बाहेर आणताना - 
 
 
 
आळंदीच्या पालखी सोहळ्याला सातशे वर्षांहून अधिक काळाची प्रदीर्घ परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीच्या पहिल्या दिवसाचा मुक्काम आळंदीतच गांधीवाड्यात असणार आहे. उद्या सकाळी पालखी पुण्याकडे रवाना होणार आहे. उद्या संध्याकाळी ७ जुलै रोजी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. दोन दिवस पुण्यातील मुक्कामानंतर पालखी ९ जुलैला आपल्या पुढील मुक्कामी म्हणजेच सासवडकडे प्रयाण करणार आहे.
 
 
पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी मंदिर परिसरात वारकऱ्यांचा विठ्ठलनामाचा जयघोष - 
 
 
 
जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी काल देहूतून प्रस्थान करून आज आकुर्डी मुक्कामी विसावली आहे. उद्या संध्याकाळी आकुर्डीतून पुण्याकडे जाण्यासाठी पालखी रवाना होणार आहे. उद्या आणि परवा असे दोन दिवस तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी पालखी आपल्या पुढील मुक्कामी म्हणजेच लोणी काळभोरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
 
भजनात तल्लीन वारकरी - 
 
 
@@AUTHORINFO_V1@@